नियम मोडून नवश्या गणपतीची आरती करणारे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांना नाशिक पोलिसांचं अभय, मात्र पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

0

नाशिक : राज्य मंत्रिमंडळातील गृहनिर्माण खात्याचे कॅबिनेटमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे रविवारी खासगी दौऱ्यानिमित्त नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांनी आनंदवली येथील नवशा गणपती मंदिरात हजेरी लावून आरती केली. त्यानंतरचे मोठे आश्चर्य म्हणजे आप मंदिरांसह सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद ठेवली जात आहेत. असे असताना दुसरीकडे सरकारमधील मंत्री महोदय चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आरतीमध्ये सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मंदिरांसह सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहे तर दुसरीकडे याच निर्बंधांचं सरसकट उल्लंघन, राज्य सरकार मधील जबाबदार मंत्रीच करताय. सरकारमधील मंत्री महोदय आव्हाड यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आरती केली. यामुळे भाविकांसाठी वेगळा अन् मंत्र्यांसाठी वेगळा नियम असतो का? असा प्रश्न भाविकांकडून उपस्थित केला गेला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा जागी झाली खरी. मात्र, जितेंद्र आव्हाड यांना वगळून अन्य पाच संशियतांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग, तसेच भादंवि कलम 1886, 269 नुसार योगेश नामदेव दराडे, स्वप्नील प्रभाकर चिंचोले, विक्रांत उल्हास सांगळे, संतोष पांडुरंग काकडे, आनंद बाळिवा घुगे या पाच कार्यकत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:49 AM 21-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here