शिळ धरणाच्या सांडव्यालगत भुस्खलन

0

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे भुगर्भातील प्रवाहांमुळे तालुक्यात भुस्खलनाचे प्रकार पुढे येत आहेत. तालुक्यातील शिळ धरणाच्या सांडव्याजवळ भुस्खलन होत असून तेथील डोंगरचा काही भाग खचण्याची भिती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत सुमारे 40 गुंठे जमीन खचली असून आंबा, काजूची चाळीस झाडे उन्मळून गेली आहेत. धुवाधार पावसाने रत्नागिरी तालुक्याला झोडपले असून पडझडीचे प्रकार सातत्याने सुरु आहेत. दोन दिवसांपुर्वी शिळ धरणाच्या सांडव्याजवळील काही भागात भुस्खलन झाले. सलग दुसऱ्या येथील आणखीन दहा गुंठे जमिन पुन्हा खचली आहे. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे हा भाग धोकादायक ठरण्याची भिती निर्माण झाली आहे. तहसिलदार शशिकांत जाधव, सरपंच संदीप उर्फ बावा नाचणकर यांच्यासह पोलिस पाटील सोनिया कदम आणि ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. 20) घटनास्थळाची पाहणी केली. सांडव्यापासून दीडशे मीटर अंतरावरील बाजू खचला आहे. तेथील डोंगर खाली येत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सुरवातीला आंब्याची चार झाडे उन्मळून गेली होती. आतापर्यंत 30 ते 40 गुंठे भाग खचला आहे. आंबा, काजूची चाळीस कलमांचे नुकसान झाले असून हा भाग असाचा कोसळत राहीला तर डोंगरावरील बागेचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:48 AM 21-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here