“बाळासाहेबांनी विषारी साप हातावर ठेवला आणि म्हणाले ही घे भेट”; राज ठाकरेंना ऐकवला ‘तो’ किस्सा

0

पुणे : महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्या शेकरू प्रजनन केंद्र आणि रानमांजर केंद्र उभारलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात या केंद्राचे उद्धाटन करण्यात आले. राज ठाकरे प्राणी संग्रहालयात येणार समजताच अनेक कार्यकर्त्यांनी तसेच प्राणीप्रेमींनीही मोठ्या प्रमाणात इथं हजेरी लावली होती.

राज ठाकरेंच्या या भेटीदरम्यान सर्पमित्र नीलम कुमार खैरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल एक किस्सा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ऐकवला. बाळासाहेबांनी कशाप्रकारे एका सापाचे प्राण वाचवले ते सांगितले. खैरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे एकदा माथेरानला आले होते. तेव्हा तुम्ही नव्हता. पण तुमची बहीण आणि आई होती, उद्धव ठाकरेही होते. त्यावेळी ते ११ वर्षांचे असतील. माझ्या इथं साप बघून ते २ किमी अंतरावरील पॅनरोमा पाँईंटवर जायला निघाले होते. तेव्हा वाटेत काही घोडेवाल एकाला सापाला मारताना दिसले. बाळासाहेब तिथे गेले त्यांनी घोडेवाल्यांना काय करता सरका बाजूला व्हा, म्हणत आपल्या खिशातून रुमाल काढला तो साप पकडला. त्यानंतर पॅनरोमाला न जाता परत माझ्याकडे आले असं त्यांनी सांगितले. इतकचं नाही तर मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय हे घ्या असं बाळासाहेब म्हणाले. मी हात पुढे केला तर त्यांनी माझ्या हातावर साप टेकवला. तो फुरसुंग प्रजातीचा साप होता. मी म्हटलं अहो, साहेब हा साप विषारी आहे. त्यावर बाळासाहेबांनी त्याने मला काही केलेलं नाही, सांभाळा आता याला म्हणत त्या सापाची जबाबदारी माझ्यावर टाकली. निसर्गमित्र बाळासाहेब नावाचा एक लेख लिहिला होता असंही नीलम खैरे यांनी राज ठाकरेंना सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:12 PM 21-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here