वेलदूरच्या स्वयंभू श्रीसिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता खचला

0

गुहागर : तालुक्यातील वेलदूर येथील स्वयंभू श्री सिद्धेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जल सुविधा योजनेतून सुमारे पाच लाख रुपये खर्चुन तीन महिन्यांपूर्वी झालेला रस्ता अतिवृष्टीमुळे खचला आहे. त्यामुळे हा मार्ग बंद झाला आहे. या रस्त्याचे काम जून महिन्यातही सुरू होते. हा रस्ता डांबरीकरण करण्यात आल्याने या मंदिराकडे तसेच धरणाकडे वाहने घेऊन जाणे शक्य झाले होते. परंतु, गेली काही दिवस धो-धो कोसळत असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर मोठे चर पडले आहेत. त्यामुळे वाहनेच नाही तर चालत जाणेही कठीण होऊन बसले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:03 PM 22-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here