2024 पर्यंत रेल्वेचे विद्युतीकरण होणार- पीयूष गोयल

0

2024 पर्यंत भारतीय रेल्वेचे पूर्णपणे विद्युतीकरण होणार आहे. सोमवारी ‘रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, 2024 पर्यंत भारतीय रेल्वेचे पूर्ण विद्युतीकरण होणे अपेक्षित आहे. हळूहळू रेल्वेमधून डिझेल इंजिन हद्दपार करण्यात येईल.’ 2024 पर्यंत रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण करण्याची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.भारत-ब्राझील बिझिनेस फोरममध्ये गोयल म्हणाले की, रेल्वे नेटवर्कचे जलद विद्युतीकरण सुरू झाले आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनारो हे 26 ते 27 जानेवारी दरम्यान भारत दौर्‍यावर असल्यामुळे भारत-ब्राझील बिझिनेस फोरम कर्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनारो यांनी भारतीय आणि ब्राझिलियन उद्योगपतींना संबोधित केले. पुढे पीयूष गोयल म्हणाले की, 2030 पर्यंत आम्ही कार्बन उत्सर्जनमुक्त होऊ. भारतची ब्राझीलबरोबर भागीदारी करण्याची इच्छा आहे. भारत ब्राझीलबरोबर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काम करेल.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here