रत्नागिरी : शॉर्टसर्किटने हार्डवेअरचे दुकान जळून खाक

0

रत्नागिरी येथील आरोग्य मंदिर भागातील हार्डवेअरचे दुकान विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. आरोग्य मंदिर येथील विश्वकर्मा ट्रेडर्स या हार्डवेअरच्या दुकानाला आज पहाटे एक वाजण्याच्या सुमाराला अचानक आग लागली. दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागल्याने लोकांनी नगरपालिकेच्या अग्निशामक यंत्रणेला कळवले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत दुकानातील मालाने पूर्णपणे पेट घेतला होता. अग्निशामक दलाच्या मदतीसाठी फिनोलेक्स कंपनीचा अग्निशामक घटनास्थळी आला. दुकानातील मालाने पेट घेतल्याने शटर उघडून जेसीबीच्या सहायाने माल बाहेर काढण्यात आला. परंतु आगीने दुकानातील मालाचे मोठे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवित हानि झाली नाही. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here