कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार, ११६६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0

पाटण : कोयना धरणातून आज ११ हजार ६६७ कयुसेक पाणी विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं धराणातील पाण्याची पातळी वाढली असल्याचे सांगितले जात आहे. सकाळी १० वाजता हा पाण्याचा विसर्ग वाढवून ५० हजार क्युसेक्स (५ फुट) इतका करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. कोयना धरणातील पाणीसाठा नियमनासाठी धरणाच्या पायथा वीजगृहातून ११ हजार ६६७ कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने कोयना नदी काठांच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागानं सातारा जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट दिला असून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:14 AM 23-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here