ब्रेकिंग: खेड तालुक्यातील मौजे पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळली; काही जण अडकल्याची भीती

0

रत्नागिरी : कालपासून जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. खेड तालुक्यातील मौजे पोसरे धामणन बौद्धवाडी येथे दरड कोसळल्याने सात कुटुंबातील काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे मिळत आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाच्या माहितीनुसार धामणंन बौद्धवाडी येथे मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे सात कुटुंबातील सतरा जण ढिगाऱ्याखाली सापडल्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच चोवीस जनावरे ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या घटनेत दहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:47 PM 23-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here