जर्मन पर्यटकांचे स्वच्छतेचे कार्य कौतुकास्पद – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

0

सागरकिनारा स्वच्छ राहावा आणि समुद्रात प्लास्टिक जाऊ नये, या भूमिकेतून रत्नागिरी येथील मांडवी बीच स्वच्छ करणारे फेलिक्स वर्गा आणि जेनी क्रिस्ट या दोघा जर्मन पर्यटकांचे कार्य बोधप्रद आहे. प्रजासत्ताक दिनी रत्नागिरीत आलेल्या या जोडीचे कौतुक करावे तेवढे थोडेच, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले. काल या जोडीने मांडवीच्या किनाऱ्यावर स्वच्छता केली होती. त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आणि त्या दोघांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मानपूर्वक बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. सागर किनारे स्वच्छ ठेवणे ही स्थानिकांनी आपली जबाबदारी म्हणून करायचे काम आहे. ते काम पर्यटनास आलेल्या जोडीने करावे, ही बाब कौतुकास्पद आहे. आपणही तितकी आत्मीयता बाळगली पाहिजे, असे मत जिल्हाधिका-यांनी व्यक्त केले. आजच्या चर्चेत या जोडीने आगामी काळात इटलीतील रोमपासून जर्मनीपर्यंत सायकल यात्रेचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. धर्मादाय निधीतून चांगली कामे व्हावीत या दृष्टीने या सायकल फेरीतून पैसे गोळा करून ते सामाजिक कार्याला देण्यात लावण्यात येतील, असेही या दोघा जर्मन पर्यटकांनी यावेळी सांगितले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here