देवस्की करत असल्याच्या रागातून चुलत भावावर कोयतीने वार

0

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा येथे देवस्की करत असल्याच्या रागातून चुलत भावावर कोयतीने वार करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी १०.३० वा. सुमारास घडली. सुभाष गंगाराम सनगरे (रा. हातखंबा सनगरेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात सीताराम जयराम सनगरे (६७, रा. हातखंबा सनगरेवाडी, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार हे दोघेही नात्याने चुलत भाऊ आहेत. यातील सुभाषला दारु पिण्याचे व्यसन असून सीताराम आपल्यावर देवस्की करत असल्याच्या रागातून बुधवारी सकाळी सुभाषने सीताराम यांच्यावर कोयत्याने मानेवर, डाव्या हाताच्या मनगटावर, पायांच्या गुडघ्यावर वार करुन त्यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:57 PM 23-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here