पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या नागपूरच्या लोकमान्यनगर ते सीताबर्डी मार्गावरच्या मेट्रोचं उदघाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. व्हिडीओ लिंकच्या सहाय्याने मुख्यमंत्र्यांनी मेट्रो रेल्वेचे उदघाटन केलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण झाले. यावेळी बोलताना गडकरींनी नागपूरमधील महत्त्वकांशी प्रकल्पाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेल्या कामांचं आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांचं कौतुक केलं. एवढचं नाहीतर सध्या राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारने विकास कामांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवावेत असं आवाहनही करायला गडकरी विसरले नाहीत. त्यानंतर हिरवा झेंडा दाखवत मंत्री नितिन गडकरी यांच्यासह उपस्थित नेत्यांनी नागपूर मेट्रोचा शुभारंभ केला.त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
