ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचे निधन

0

मुंबई : जेष्ठ कवी, प्रगतीशील लेखक चळवळीचे आधारवड कॉम्रेड सतीश काळसेकर यांचे आज पहाटे पेण येथे निधन झाले. ते बडोदा बँकेतून निवृत्त झाले होते. संघटनेत देखील ते सक्रिय होते. हिमालयातील अनेक प्रवास आयोजित करण्यात त्यांनी सतत पुढाकार घेतला होता. निसर्गप्रेमी ही त्यांची खास ओळख होती. चळवळीतील कार्यकर्त्यांना सांस्कृतिक अंगांनी प्रगत करणे यासाठी त्यांनी खूप पुढाकार घेतले होते. त्यांच्या निधनाने प्रगतीशील साहित्य, सांस्कृतिक चळवळीचे तर खूप मोठे नुकसान झाले आहे. मराठी साहित्यातील कवी, संपादक, अनुवादक, लघुनियतकालिकांच्या चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते, मार्क्सवादी चळवळीतील ते सक्रिय कार्यकर्ते होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:22 AM 24-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here