मुंबईमागोमाग दिल्लीलाही कोरोनाची चाहूल

0

अवघ्या चीनला हादरवणाऱ्या कोरोना व्हायरसची चाहूल आता हिंदुस्थानमध्येही लागली आहे. मुंबई, बिहार, चंदिगढनंतर आता दिल्लीतही कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात या तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या असून त्याचे अहवाल अजून आलेले नाहीत, अशी माहिती रुग्णालयाच्या अधीक्षक मीनाक्षी भारद्वाज यांनी दिली आहे. ‘कोरोना’ संशयितांमध्ये सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणे आढळत आहेत. शिवाय श्वासोच्छ्वास घेण्यासही त्रास जाणवतो. कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पहिली घटना 31 डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. हा आजार 2003 मध्ये पसरलेल्या सीव्हिअर अॅक्यूट रेसिपिरेट्री सिंड्रोम म्हणजे सार्स सारखाच धोकादायक असल्याचे मानले जाते. चीन व्यतिरिक्त कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण हे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलंड, हाँगकाँग, मकाऊ आणि तैवानमध्ये आढळून आले आहेत. कोरोनाची दहशत पसरल्यामुळे आता हिंदुस्थानातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here