मुसळधार पाऊस आणि आपत्ती असतानाही निलेश राणे चिपळूणमध्ये दाखल

0

◼️ मदतीचे साहित्य सुपूर्त; एसपी; सीईओ यांच्याकडून घेतला पुराचा आढावा

चिपळूण : मुसळधार पाऊस, कोसळणाऱ्या दरडी, बंद झालेले विविध मार्ग, संपर्कात येणाऱ्या अडचणी या सगळ्या गोष्टींचा सामना करत केवळ चिपळूणवासीयांना मदत पोहोचविण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे शुक्रवारी मुंबईहून चिपळूण येथे दाखल झाले. सोबत आणलेली मदत त्यांनी संबंधितांकडे सुपूर्त केली तर एस पी आणि सीईओ यांच्याकडून परिस्थितीचा आढावा सुद्धा घेतला. गुरुवारी चिपळूण शहर आणि परिसरात महापूर आल्याने हजारो माणसे विविध ठिकाणी अडकून राहिली होती. चिपळूनवासीयांनी 24 तासांपेक्षाही अधिक काळ अन्न पाण्याविना मदतीची वाट पाहत पाण्यात काढली. ही परिस्थिती विविध माध्यमातून भाजपा प्रदेश निलेश राणे यांच्यापर्यंत पोहोचत होती. अशावेळी चिपळूनवासीयांना आता मदतीची गरज आहे केवळ याच भावनेतून निलेश राणे शुक्रवारी सकाळी लवकर मुंबईतून चिपळूणला निघाले. त्यांनी आपल्या सोबत आवश्यक ते समान भरून घेतले. मात्र मुंबई ते चिपळूण हा त्यांचा प्रवास आज नेहमीसारखा झाला नाही. निसर्गाने दोन दिवसापासूनच आपले रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली होती. त्यामुळे चिपळूणला येणाऱ्या जवळपास सर्वच मार्गांवर अनेक अडचणी होत्या. काही ठिकाणी दरडी कोसळत होत्या, काही ठिकाणी पाणी भरले होते. रस्ते बंद होते. संपर्क तुटला होता. परंतु याही परिस्थितीचा सामना करत निलेश राणे शुक्रवारी चिपळूण येथे पोहोचले. त्यांनी चिपळूणच्या नागरिकांसाठी आणलेल्या जीवनावश्यक वस्तू पाणी, बिस्किटे, चिवडा, फरसाण, चटई, ब्लॅंकेट आशा वस्तू संबंधितांकडे वाटपासाठी सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडून त्यांनी चिपळूण पुराची आणि वस्तुस्थिती जाणून घेतली. तिथल्या चिपळूणवासीयांशी सुद्धा चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:45 AM 24-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here