खेड पोसरे दुर्घटनेतील १७ जणांचे मृतदेह हाती

0

रत्नागिरी : खेड तालुक्यातील पोसरे येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत गाडल्या गेलेल्या 17 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. येथील सात घरं दरडी खाली गाडली गेली होती. अजून शोध कार्य सुरु आहे. यामध्ये सात जण जखमी अवस्थेत सापडले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळाल्या माहितीनुसार खेड पोसरे येथे 23 जुलै रोजी दरड कोसळली होती. या दुर्घटनेत सात घर दरडीखाली गाडली गेली होती. झालेल्या या दरडदुर्घटनेत 17 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. दुर्घटनेतील मृतांमध्ये पुढील लोकांनाच समावेश आहे. त्यात श्रीमती रंजना रघुनाथ जाधव (वय -50), रघुनाथ जाधव (वय -55), विकास विष्णु मोहिते (वय 35), श्रीम संगिता विष्णु मोहिते ( वय -69), सुनिल धोंडीराम मोहिते (वय -47 ), सुनिता धोंडीराम मोहिते (वय -42), आदेश सुनिल मोहिते (वय -25), श्रीम.काजेल सुनिल मोहिते (वय -19 ), श्रीम सुप्रिया सुदेश मोहिते (वय -26), कु विहान सुदेश मोहिते (वय 5), धोडीराम देवू मोहिते (वयं 71), श्रीम सविता धोडीराम मोहिते (वय -69), वसंत धोडीराम मोहिते( वय -44), श्रीम वैशाली वंसत मोहिते (वय -40), कु. प्रिती वसंत मोहिते (वय १), सचिन अनिल मोहिते (वय 29), श्रीम सुमित्रा धोडू म्हापदी (वय 69) यांचे मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यामध्ये अनिल रघुनाथ मोहिते वय -49 श्रीम वसंती रघुनाथ मोहिते वय -68 श्रीम प्रिती सचिन मोहिते वय -27 श्री.सुरेश अनिल मोहिते वय -27 श्रीम सनीअनिल मोहिते वय -25 श्रीम सुजेल वसंत मोहिते वय -18 कु विराज सचिन मोहिते वय -4 यांचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
3:58 PM 24-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here