हे सरकार ‘शिवशाही’ नव्हे तर ‘शवशाही’ : प्रेम शुक्ला

0

मुंबई : सध्या महाराष्ट्रात भयानक परिस्थिती आहे. एकीकडे महामारी तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्रावर ओढावली आहे. राज्यातील सरकार ‘शिवशाही’ नसून ‘शवशाही’ बनलं आहे. अशा शब्दात भाजपाचे नवनियुक्त राष्ट्रीय प्रवक्ते श्री. प्रेम शुक्ला यांनी टीका केली आहे. वसंत स्मृती, दादर येथील मुंबई भाजपा कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्या अपयशावर प्रकाश टाकताना भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. प्रेम शुक्ला म्हणाले की, देशातील कोरोना मृत्यूच्या एकूण मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे मुंबई शहरात सर्वाधिक मृत्यूंची संख्या आहे. असे असतानाही मिडीयाला गुंडाळून बेस्ट सीएम, बेस्ट महापालिकाचं अवॉर्ड मिळवण्यात मुख्यमंत्री व्यस्त आहेत असा खरमरीत टोला भाजपा राष्ट्रीय प्रवक्ते श्री. प्रेम शुक्ला यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सध्या सुरू असलेल्या सरसकट भ्रष्टाचाराकडे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. प्रेम शुक्ला यांनी लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की, विकासकामांवर दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करूनही मुंबई दरवर्षी पावसात तुंबतेच. नाल्यांच्या साफसफाईसाठी मुंबई महानगरपालिका दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करूनही अद्यापही या सरकारला पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करणारी योग्य यंत्रणा तयार करता आलेली नाही. सध्याचे सरकार आणि मुंबई महानगरपालिका काही मोजक्या ठेकेदारांना फायदा मिळवून देण्यासाठी काम करीत आहेत. महाराष्ट्र सरकार गृहमंत्र्यांसाठी दरमहिना करोडो रुपये मुंबई पोलिस विभागातूनच उकळत आहे; यासंदर्भात सीबीआय चौकशी करीत असून चौकशी थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या फेऱ्या मारत आहे, असा हल्लाबोल भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. प्रेम शुक्ला यांनी राज्य सरकारवर केला आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात मृत्यू संख्येची अफरातफरी करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची खरी संख्या सरकार लपवत असल्याचा आरोप आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकारवर केला आहे. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांच्यासह भाजपाचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, मिडीया प्रमुख श्रीमती श्वेता परुळकर उपस्थित होते.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:01 PM 24-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here