मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का देत तीन आमदारांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे मंगळवारी दुपारी सादर केले. या तीन आमदारांसोबत काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांनी ही आपला राजीनामा सादर केला. या चारही आमदारांचे राजीनामे मंजूर करण्यात आले असून उद्या ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातो. सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. वैभव पिचड हे नगर अकोल्याचे तर ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आणखी अस्वस्थता आहे.
