रत्नागिरी : ९ वर्षाच्या पर्यटकाच्या पायाला जेलीफिशने घेतला चावा

0

भाट्ये समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या ९ वर्षीय मुलाच्या पायाला जेली फिशने चावा घेतल्याचा प्रकार सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला. कोल्हापुरातून काही पर्यटक रत्नागिरीत आले होते हे पर्यटक भाट्ये समुद्रात आंघोळीसाठी उतरले असता हा प्रकार घडला. रत्नागिरीत सुट्टीच्या दिवसात कुटुंबीयांसहीत पर्यटनासाठी आलेल्या भाट्ये किनारी आंघोळीला गेलेल्या लहान मुलाच्या दोन्ही पायांना ‘जेली फिश’ ने चावा घेतल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. निखिल निशांत जयस्वाल ( वय ९, रा. प्रतिभानगर , जि . कोल्हापूर) असे जेली फिश चावलेल्या मुलाचे नाव आहे . ही घटना सोमवारी ( ता . २७ ) दुपारी साडेबाराच्या सुमारास भाट्ये किनारी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयस्वाल कुटुंबीय पर्यटनासाठी रत्नागिरीत आले होते. भाटये किनारी आंघोळीला गेले होते. त्यावेळी जयस्वाल कुटुबातील मुलगा निखिल अगदी किनाऱ्यालगत पाण्यात आंघोळीला गेला असताना जेली फिशने त्याच्या दोन्ही पायांना चावा घेतला. त्यात त्याला अस्वस्थ वाटू लागले . कुटुंबीयांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर पर्यटक जयस्वाल कुटुंबीय निखिलला घेऊन कोल्हापूर येथे गेले.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here