शुक्रवारपासून सलग तीन दिवस बंद राहणार बँका

0

गुरुवारपर्यंत बँकेसंदर्भात तुमची जर काही कामे असतील तर ती लवकर उरकून घ्या, कारण शुक्रवारपासून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संपामुळे बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत ग्राहकांना बँकेची कामे उरकावी लागतील. १ फेब्रुवारी रोजी पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे. याच दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे, पण आपल्या संपावर बँक कर्मचारी ठाम असल्यामुळे शुक्रवार ते रविवार असे सलग तीन दिवस बँकिंग सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी दोन दिवस संपाची हाक दिली आहे. देशव्यापी संपाची ३१ जानेवारीला घोषणा करण्यात आल्यामुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला देशव्यापी संप आहे. २ फेब्रुवारीला रविवार असल्याने सलग ३ दिवस बँका बंद राहणार आहेत. पगारवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here