दापोली : तालुक्यातील हर्णे सुतारवाडी येथून २० वर्षीय नेहा घाग आपल्या दहा महिन्याच्या मिहीर या मुलांसह बेपत्ता झाल्याची खबर निलेश घाग यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली. याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार नीलेश घाग हे नोकरीनिमित्त खेड भडगाव येथे राहतात. त्यांची पत्नी नेहा व मुलगा मिहीर निलेशच्या आई, भाऊ व पुतण्या यांच्या समवेत हर्णे येथे राहतात गुरुवारी २२ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास नेहा आपल्या लहान मुलाला घेऊन खेडला नीलेश याच्याकडे जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली. नीलेश याच्या भावाने दुपारी फोन करून नेहा पोहोचली का, याची चौकशी केली. त्यावेळेला खेडला खूप पाऊस असून नेहा पोहोचली नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर नीलेश याने नेहा हिचा शोध घेत दापोली गाठली. मात्र, नेहा आढळून आली नाही.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:56 AM 26-Jul-21