त्यांचा आवाजच ‘राउडी राठोड’सारखा; भास्कर जाधवांच्या वर्तणुकीवर ‘ती’ महिला स्पष्टपणे बोलली

0

चिपळूण : राज्यातील विविध भागात गेल्या आठवडाभर झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. चिपळूणमध्ये मुख्यमंत्री पाहणी करायला गेले असताना घडलेल्या घटनेवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भास्कर जाधव यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यावरुन त्यांची भाषा उर्मट असल्याचं बोललं जातंय. यासंदर्भात आता, स्वत: चिपळूणमधील त्या महिलेनं स्पष्टीकरण दिलं आहे.

अद्याप आमच्याकडे लाईट नाहीये, माझ्या मोबाईललाही चार्जिंग नाही. त्यामुळे, सोशल मीडियावर काय अपप्रचार करत आहेत, हे मला माहिती नाही. त्यांनी काहीही उद्धट बोलले नाही, ते जे बोलले ते वडिलकीच्या नात्याने बोलले. त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत. त्यांचा आवाजच राऊडी राठोडसारखा असल्यामुळे ते तसं वाटलं असेल. पण, प्रत्येकवेळी ते मदत करतात, सगळ्या व्यापाऱ्यांनाही ते मदत करतात. कालही ते तशाच मदतीच्या भावनेने आले होते, ते काहीही वाईट बोलले नाहीत. त्यांचं बोलणंच तसं आहे. त्यामुळे, चुकीचा अर्थ काढण्यासारखं काहीही नाही, असे चिपळूणमधील त्या महिला स्वाती भोजने यांनी म्हटलं आहे.

मी कुठल्याही दबावात हे बोलत नाही, जर दबाव असता तर मी कालच आमदार-खासदारांचा पगार काढला नसता. ते त्यांच्या धावत्या दौऱ्यात आणि आम्ही आमच्या टेंशनमध्ये त्यातून ते वडिलकीच्या नात्याने असं बोलले, असे स्पष्टीकरण स्वाती भोजने यांनी भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर दिलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
4:21 PM 26-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here