‘शिवभोजन’ योजना बोगस आणि नियोजन शून्य : निलेश राणे

0

शिवभोजन योजना बोगस आणि नियोजन शून्य आहे. हा प्रयोग लोकांच्या पैशाचा चुराडा आहे, असे म्हणत भाजपचे नेते माजी खासदार ,नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी ‘ शिवभोजन ‘ योजनेवर टीका केली आहे.

HTML tutorial

राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यार गरिबांना १० रुपयात पोटभर जेवण देण्याचे आश्वासन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार आता राज्यात १० रुपयात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्यास सुरवात झाली आहे. राज्य शासनास ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे.२६ जानेवारी रोजी प्रत्येक जिल्ह्यातील पालक मंत्र्यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ झाला आहे.

निलेश राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील एका घटनेचा संदर्भ देत योजनेला ग्रहन लागल्याचे ही म्हटले आहे.तर कालच माजी मुख्यमंत्री,विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी असे म्हटले आहे की ‘ जेवढे लाभार्थी शिवभोजन योजनेचे जेवण घेत आहेत ,तेवढे लोकं रोज गुरुद्वार्यात जेवतात आणि तेही फुकट ,आणि आज राणे यांनी टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here