आपत्तीच्या काळात लोकांना आपलेपणाचा आधार द्या, त्यांचे मनोधर्य वाढेल : आमदार योगेश कदम

0

खेड : आपत्ती कोणतीही असेल संकटात अडकलेल्या लोकांना मदत करून आपलेपणाचा आधार द्या, आपल्या आधाराने त्यांचे मनोधर्य वाढेल, अशा सूचना आमदार योगेश कदम यांनी शिवसैनिकांसह स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अतिवृष्टीने खेड शहरातील नागरिकांसह तालूक्यातील रहिवाशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे मनोधर्य वाढविणे गरजेचे आहे. संकटात सापडलेल्यांना उमेदीसाठी आपलेपणाचा आधार दिला गेला पाहीजे. तरच लोक या परिस्थितीतून सावरतील. मदतीचा हात देतानाच त्यांच्या मनालाही आपलेपणाचा आधार शिवसैनिकांसह स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी निर्माण करावा, असे ते म्हणाले. खेड तालुक्यात अतिवृष्टीने आलेल्या पूराच्या पाण्याने नागरी वस्तीत प्रचंड नुकसान केले. काही ठिकाणी दरडी कोसळल्या. पूराच्या पाण्यात अनेकांचे संसार वाहून गेले. विविध ठिकाणच्या स्वयंसेवी संस्था, मंडळे, दानशूर व्यक्ती मदतीचा हात पुढे करत आहेत. या संकटातून बाहेर येण्यासाठी काही वेळ लागणार आहे. आमदार या नात्याने लोकप्रतिनिधी म्हणून आपणही अन्नधान्य, कपडे, ब्लँकेट, पाणी आदी वस्तू तसेच शिवतेज आरोग्य सेवा संस्थेकडून पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे कदम यांनी सांगितले. आपण शासनाकडूनही लवकर मदत मिळवून देऊ. मात्र, आज खरी गरज संकटात अडकलेल्यांचे मनोधर्य वाढविण्याची आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी त्यांना आधार देण्याची आहे. ही गरज ओळखून शिवसैनिकांनी तसेच स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी काम करावे. आपले कर्तव्य म्हणून संकटात सापडलेल्यांच्या मनाचा ठाव घेत त्यांना आपलेपणाचा आधार द्या, अशी सूचना योगेश कदम यांनी केल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:12 PM 27-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here