‘उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं, पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही’

0

मुंबई : आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना खास शैलीत शुभेच्छा दिल्या. ‘उद्धव ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे’, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला मारला आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी राष्ट्रीय नेता व्हावं, देशाच नेतृत्व करावं, असं म्हटलं होतं. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं, असं वाटत असेल तर चांगलंच आहे. उद्धव ठाकरेंनी नक्की मोठं व्हावं, राष्ट्रीय नेता व्हावं, पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही’, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. तसेच, मुख्यमंत्र्यांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:58 PM 27-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here