महाड, पोलादपूर येथील महापुरामुळे बाधित कुटुंबांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

0

रायगड : महाड व पोलादपूर तालुक्यात दि.21 व 22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी महापूराची परिस्थिती निर्माण झाली. या बाधित शहरांमध्ये व गावांमध्ये मोठया प्रमाणात जनजीवन विस्कळीत होवून पशूधन व खाजगी मालमत्तांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा वेळी त्यांना आधार देवून आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी समाजातील सामाजिक संस्था / ट्रस्ट / फाऊंडेशन्स / सीएसआर कंपन्या / दानशूर व्यक्ती यांच्याकडून आर्थिक मदत व साहित्याच्या स्वरुपात सढळ हस्ते मदत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खालील खाते क्रमांक व पत्ता उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे, त्यांनी खालील बँक खात्यामध्ये निधी जमा करावा:- •खात्याचे नाव :- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी ( District Disaster Response Fund ) •बँकचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया,मुख्य शाखा, अलिबाग ( State Bank of India, Alibag ) •बँक खात्याचा नंबर : – 38222872300, • IFSC Code : – SBIN0000308 तसेच ज्यांना साहित्य स्वरुपात मदत करावयाची आहे, त्यांनी खालील ठिकाणी मदत पोहोच करावी— •नगरपालिका प्रशासकीय इमारत, महाड • संपर्क : उपविभागीय अधिकारी, श्रीमती प्रतिमा पुदलवाड, मोबाईल नंबर – 8698710704 / 8369785053, श्री.सुरेश काशीद, तहसिलदार, महाड, मोबाईल नंबर – 9921332695 / 9324551377

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:19 PM 27-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here