गोळवली येथे जनावरे घेऊन जाणाऱ्या तीन गाड्या पकडल्या

0

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील गोळवली टप्पा येथे जनावरे घेऊन जाणाऱ्या तीन गाड्या पकडण्यात संगमेश्वर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. गाडीत एकूण सात बैल व सहा पाडे अशी तेरा जनावरे दाटीवाटीने कोंबून विनापरवाना वाहतूक करत असल्याचे आढळल्याने पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व जनावरे कत्तलखान्यात नेत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे तुरळवरून सिंधुदुर्गकडे जनावरे घेऊन तीन टेम्पो रवाना होणार असल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पहाटे तीन वाजता गोळवली टप्पा (ता. संगमेश्वर) येथे पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे व त्यांचे सहकारी यांनी सापळा रचून हे तिन्ही टेम्पो पकडले. यावेळी बोलेरो पिकअप (एमएच ०८, डब्लू ३४३०), अशोक लेल्यांड दोस्त टेम्पो (एमएच ०७, पी ३२३७) व टेम्पो (एमएच ०७, पी ३१०८) यातून सात बैल व सहा वासरे ही दाटीवाटीने भरून विनापरवाना घेऊन जात होते. तीन वाहनासह अनिल काळू तावडे (२५), सुनील काळू तावडे (२७, दोघे राहणार तुरळ हरेकरवाडी), कृष्णा धोंडू निकम (४२), गणेश रमेश निकम (२२, दोघे रा. कणकवली), प्रसाद रामा निकम (२६, रा. फोंडा) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक उदय कुमार झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस तपास करत आहेत.

त्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:04 PM 27-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here