सायना नेहवालचा भाजपात प्रवेश

0

जगविख्यात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी बुधवारी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. सायना यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अरुण सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी सायना नेहवाल यांची बहीण चंद्रांशु यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माध्यमांशी बोलताना नेहवाल म्हणाल्या की, मी देशासाठी खूप मेहनत करून पदकं जिंकली आणि मला मेहनती लोक आवडतात. पंतप्रधान नरेंद मोदी आपलय देशाची सेवा करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करीत आहेत. त्यांच्यासोबत मला देशासाठी काहीतरी करायचे आहे. ते माझासाठी प्रेरणेचा स्रोत आहेत. सामाजिक माध्यमांवर अनेक वेळा त्यांनी पंतप्रधान नरेंद मोदी आणि केंद्र सरकारची स्तृती केली होती. सायना नेहवाल यांचा जन्म हरियाणात झाला मात्र बॅडमिंटनच्यानिमित्त त्या हैदराबाद येथे स्थायिक झाल्या. युवकांमध्ये प्रचंड आकर्षण असलेल्या सायना नेहवाल यांच्या भाजप प्रवेशामुळे दिल्लीत विधानसभा तसेच देशात इतर भागातही प्रभाव पडणार असलयाचे बोलले जाते. 29 वर्षीय सायना नेहवाल यांनी अनेक आंतर-राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि विजय मिळवला. 2009 आणि 2015 साली बॅडमिंटन क्षेत्रात जगातील पहिले स्थान मिळविण्याची कामगीरी त्यांनी केली. 2016 साली त्यांना पदं भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच प्रमाणे राजीव गांधी खेल रत्न, अर्जुन पुरस्कार अशा अनेक सन्मानांच्या त्या मानकरी ठरल्या. सायना नेहवाल यांनी जवळपास 24 आंतर-राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या असून लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकही पटकाविले. सध्या त्या टोकोयो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करीत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here