“मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम करू शकतात, पण मुंबईकरांना…; आज तरी जनहिताचे निर्णय करणार का?”

0

मुंबई : राज्यातील महानगरांमधील पॉझिटिव्हिटी रेट झपाट्याने कमी होत असतानाही राज्य सरकार निर्बंध शिथिल करीत नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा पवित्रा व्यापारी संघटनांनी घेतला आहे. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असतानाही राज्य सरकारने लादलेले निर्बंध कायम असल्याने सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, नोकरदार अक्षरश: वैतागले असून हे निर्बंध तातडीने शिथिल करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. निर्बंधांना न जुमानता व्यवहार चालू करण्याशिवाय आता पर्याय नाही, अशी भावना जनमानसात वाढीस लागत आहे. याच दरम्यान भाजपाने यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. आज तरी जनहिताचे निर्णय करणार का? असा सवाल विचारला आहे. मुख्यमंत्री Work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना ऑफिसला जावेच लागते. लोकल प्रवास बंदीमुळे जनतेत असंतोष आहे असं देखील म्हटलं आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “आज उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाची बैठक आहे. आज तरी जनहिताचे निर्णय करणार का? मुख्यमंत्री Work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना ऑफिसला जावेच लागते. लोकल प्रवास बंदीमुळे जनतेत असंतोष आहे. उद्रेक होण्यापूर्वी राज्य सरकारने तातडीने निर्बंध शिथिल करून लोकल प्रवास सर्वांसाठी सुरू करावा” असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

“मागचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष शाळांअभावी वाया गेल्याने पालक व विद्यार्थी चिंताग्रस्त असून घरबसल्या शिक्षणाचा खर्चही विनाकारण वाढत आहे. अकरावी प्रवेशाचा घोळ अजूनही सुरूच असून कोविड संसर्ग कमी होत असल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा” अशी मागणी केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच “मुख्यमंत्र्यांनी तब्बल दोन तासांची प्रत्यक्ष पाहणी करूनही अतिवृष्टी व दरडी कोसळण्यामुळे संकटग्रस्त असलेल्या जनतेस अद्यापही सरकारने कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. संकटग्रस्त जनतेसाठी कारण न शोधता तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करून पुनर्वसनाची प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्यात यावी” अशी मागणीही उपाध्ये यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:47 PM 28-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here