संगमेश्वरमधील शशांक घडशी हे २०१९-२० चा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित

0

संगमेश्वर तालुक्यातील शशांक शांताराम घडशी यांना २०१९-२० चा क्रीडा क्षेत्रातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळाला आहे. ते तायक्वोँदो क्षेत्रातील जिल्ह्याच्या इतिहासातील पहिला पुरस्कार मिळवणारी व्यक्ती ठरले आहेत. महाराष्ट्र शासनाचा सन २०१९-२० जिल्हा क्रीडा गुणवंत मार्गदर्शक पुरस्कार जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अनिल परब साहेब यांच्या हस्ते स्वीकारताना छायाचित्रात दिसत आहेत, तसेच सोबत जिल्हाधिकारी श्री. सुनील चव्हाण साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री किरण बोरवडेकर, तायकवांडो जिल्हा संघटना अध्यक्ष श्री व्यंकटेश कर्रा सर व आई, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. रोहन जी बने, जिल्हा शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष श्री. राजेन्द्रजी महाडिक, शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री. विलासजी चाळके, तायकवांडो संगमेश्वर तालुका सर्व सिनियर खेळाडू, संगमेश्वर तालुक्यातील पहिला ब्लॅक बेल्ट श्री. सौरभ वनकर सर, राष्ट्रीय पंच व ब्लॅक बेल्ट श्री चिन्मय साने सर, श्री संकेत मापुस्कर सर, श्री किरण डिंगणकर सर, श्री स्वप्नील दांडेकर सर शुभेच्छा देताना छायाचित्रात दिसत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here