नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार, भाजपासोबत युती नाही : संदीप देशपांडे

0

नाशिक : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाली होती. त्या भेटीनंतर मनसे-भाजप युती होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. पण, आता त्या चर्चांना पूर्णविराम लागलाय. नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे. मनसे नेते अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे आज नाशिकच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. गेल्या पाच वर्षात नाशिककरांची पुरती निराशा झाली. पण, अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे नाशिकमध्ये कमबॅक करेल, असा विश्वास संदीप देशपांडेंनी बोलून दाखवला. तसेच, सध्या तरी आमच्याकडे कुणाकडूनही युतीचा प्रस्ताव आलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:35 PM 28-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here