मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना उपाचारांसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना जयंत पाटील यांना त्रास सुरू झाला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून रूग्णालयाकडे रवाना झाले. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल कऱण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
6:16 PM 28-Jul-21