चिपळूणमध्ये युद्धपातळीवर सफाई मोहीम सुरू

0

रत्नागिरी : गेल्या आठवड्यात आलेल्या महापुरानंतर चिपळूण शहरात सर्वत्र झालेला चिखल आणि कचरा दूर करून शहर स्वच्छ करण्याची मोहीम चिपळूण पालिकेने युद्धपातळीवर सुरू केली आहे. नगराध्यक्ष सौ. सुरेखा खेराडे, माजी आमदार बाळ माने या मोहिमेवर विशेष लक्ष ठेवून आहेत. आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव यांचेही मार्गदर्शन लाभत असून ठाणे, मुंबई महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी शहरात दाखल झाले आहेत. आ. भास्कर जाधव आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त आणि १५० कर्मचारी चिपळूणला दाखल झाले आहेत. मलेरिया, डेंग्यूचे जंतू पसरू नयेत म्हणून जंतुनाशक फवारणीसुद्धा सुरू केली आहे. डॉक्टरांची पथके दाखल झाली आहेत. शहरातील स्वच्छता अभियान नगराध्यक्ष सौ. सुरेखा खेराडे, भाजपा नेते बाळ माने आणि स्थानिक आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष सूचना दिल्यामुळे आणि यापूर्वी आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केल्यामुळे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे आणि उपायुक्त अशोक बुरुपल्ले यांच्यासमवेत १० अधिकाऱ्यांचे पथक चिपळुणात मंगळवारी दाखल झाले. त्यांच्यासोबत १५० कर्मचारी अधिकारी असून त्यात सॅनिटरी इन्स्पेक्टर, डॉक्टर्सचा समावेश आहे. या पथकांनी शहराचे २४ भाग केले आहेत. त्यानुसार बुधवार सकाळपासून १५ भागांत कामाला सुरवात झाली. या १५ पथकांमध्ये १ जेसीबी, २ डंपर आणि १८ सफाई कर्मचारी, तसेच फवारणीसाठी ५ कर्मचारी आहेत. मलेरिया, डेंग्यू व अन्य साथी पसरू नयेत याकरिता जंतुनाशकांची फवारणी केली जात आहे. या फवारणीसाठी मुंबई महापालिकेचे ७० कर्मचारी कार्यरत आहेत. वैद्यकीय पथकांनी परांजपे, बांदल आदी तीन शाळांमध्ये वैद्यकीय शिबिरे सुरू केली आहेत. आरोग्यविषयक समस्या तेथे सोडवण्यात येतील. किरकोळ आजारी रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे आणि उपायुक्त अशोक बुरुपल्ले यांनी यापूर्वी अशा प्रकारचे आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज यशस्वीपणे हाताळले आहे. या अनुभवी पथकाने नुकतेच महाडलादेखील काम केले आहे. पुढच्या २-३ दिवसांत चिपळूणमधील चिखल, कचरा स्वच्छता करून काम पूर्ण करण्याचे आव्हान या पथकाने स्वीकारले आहे. विशेष म्हणजे रात्रपाळीसाठी वेगळ्या टीम केल्या आहेत. ही पथके रात्री मार्केट भागात स्वच्छता अभियान राबवणार आहेत.
दरम्यान, नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांची अनौपचारिक बैठक बोलावली असून व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनाही त्यांनी बोलावले आहे. त्यांच्या सूचना जाणून घेऊन मदत कुठे हवी, स्वच्छता याविषय़ी माहिती त्या जाणून घेणार आहेत. स्वच्छता अभियानाकडे आ. शेखर निकम, आ. भास्कर जाधव हेसुद्धा लक्ष देत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:06 AM 29-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here