दरड कोसळल्याने आठ दिवस अडकून पडलेल्या २० जणांची एनडीआरएफच्या पथकाने केली सुटका

0

रत्नागिरी : रिक्टोली (ता. चिपळूण) येथे आठ दिवसांपूर्वी दरड कोसळल्याने तेथे अडकून पडलेल्या २० जणांची बुधवारी एनडीआरएफच्या पथकाने सुटका केली. दोन वर्षांपूर्वी तिवरे येथील धरण फुटल्याने २४ जणांचा मृत्यू झाला होता. त्याच गावाजवळ रिक्टोली गाव आहे. तेथील इंदापूरवाडीत गेल्या २२ जुलै रोजी दरड कोसळली. मुंबईवरील २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले शशिकांत शिंदे यांचे हे मूळ गाव आहे. तेथे दरड कोसळून शेतीचे अतोनात नुकसान झाले. या गावात जाणाऱ्या रस्त्यांना भेगा पडल्या. गावाचा संपर्क तुटला. ही माहिती प्रशासनापर्यंत पोहोचली नव्हती. गावचा आणि इंदापूरवाडीचा रस्ता खचून मोठ्या भेगा पडल्या. गावाची फोन सेवाही बंद आहे. गावातून नऊ किलोमीटर चालत नेटवर्कमध्ये येऊन राहुल गणपत शिंदे नावाच्या तरुणाने फोटो पाठवून ही माहिती दिली. त्यानंतर प्रशासनाने एनडीआरएफचे पथक तेथे पाठविले. या पथकाने नदी, दुर्गम डोंगर, चढ असा चार किलोमीटरचा अत्यंत अवघड टप्पा ओलांडून ग्रामस्थांशी संपर्क साधला. त्यांना स्ट्रेचर्सवरून तसेच खांद्यावरून वाहून सुरक्षित ठिकाणी आणले. आठ महिला आणि १२ पुरुष अशा २० जणांची सुटका या पथकाने केली. काल बुधवारी सायंकाळी ७ वाजता हे बचावकार्य पूर्ण करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:44 AM 29-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here