रत्नागिरी, रायगडसाठी दोन कोटी, अन्य पूरग्रस्त जिल्हय़ांसाठी 50 लाखांचा निधी

0

मुंबई : राज्यातील पूरस्थितीचा अहवाल बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. रत्नागिरी, रायगडसह राज्यातील 11 जिह्यांची स्थिती यात मांडण्यात आली आहे. पुरातून सावरण्यासाठी रत्नागिरी, रायगडसाठी प्रत्येकी दोन कोटींचा तर पूरग्रस्त अन्य जिह्यांसाठी प्रत्येकी 50 लाखांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालानुसार राज्यातील मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, वर्धा आणि अकोला या जिह्यांमधील पूरस्थिती आता नियंत्रणात आहे. कोल्हापूर व सांगली जिह्यात अद्यापही काही ठिकाणी पाणी आहे. सध्या एनडीआरएफच्या 16 तुकडय़ा सहा जिह्यांत तैनात असून सर्वाधिक सहा तुकडय़ा कोल्हापूरमध्ये तर चार तुकडय़ा सांगलीत तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येकी एक संरक्षण दलाची तुकडी या दोन्ही जिह्यांत तैनात करण्यात आली आहे. रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिह्यांतील 349 निवारा पेंद्रांत अद्यापही 53 हजार 295 जणांना आसरा देण्यात आला आहे. यात सर्वाधिक 40 हजार 688 जण हे कोल्हापूर जिह्यातील 216 निवारा पेंद्रांत वास्तव्यास आहेत. रत्नागिरीत खेड, चिपळूणमध्ये 695 जण, रायगडात महाड येथे 1555 जण, सांगलीत 7455 जण, साताऱयात 2902 जण निवारा पेंद्रांत आश्रयाला आहेत. राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:38 PM 29-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here