रोहित, कोहलीची विक्रमी खेळी; कोहलीने धोनीचा विक्रम मोडला!

0

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामना आज बुधवारी सुरु आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून मजबूत सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या दमदार खेळीने 89 धावांची सलामी दिली. दरम्यान या सामन्यात विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडत अव्वल स्थान पटकावले. विराट कोहलीच्या 25 व्या धावावर नवीन विक्रम झाला. भारताकडून ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान कर्णधार म्हणून कोहलीने पटकावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here