कोल्हापूरमध्ये बघायला मिळणार प्रो कबड्डीतील मातब्बर खेळाडूंचा खेळ

0

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जांभळी क्रीडा मंडळ, जांभळी यांच्या सौजन्याने राज्यस्तरीय व्यावसायिक निमंत्रीत पुरुष कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. स्व. डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटीलसाहेब माजी आमदार यांच्या स्मरणार्थ स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. सदर राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धा दिनांक ३ फेब्रुवारी २०२० ते ६ फेब्रुवारी २०२० दरम्यान होणार आहे. जांभळी क्रीडा मंडळ, जांभळी, ता. शिरोळ, जी. कोल्हापूर येथे होणार आहे. मातीच्या मैदानावर होणाऱ्या यास्पर्धेत महाराष्ट्रातील प्रो कबड्डीत खेळणाऱ्या मातब्बर खेळाडूंचा खेळ बघायला मिळणार आहे. दिनांक ३ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता दौलत देसाईसाहेब (जिल्हाधिकारी, कोल्हापूर) यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभात गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रा.संभाजीराव पाटील सरकार्यवाह कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखानाचे चेअरमन गणपतराव आप्पासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत एयर इंडिया, भारत पेट्रोलियम, महिंद्रा अँड महिंद्रा, इनकम टॅक्स, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, कस्टम, महिंद्रा कोटक, बँक ऑफ बडोदा, मुंबई बंदर, सेंट्रल बँक, महाडिक उद्योग समूह, रायगड पोलीस हे संघ सहभागी होणार आहेत. अंतिम विजयी संघास १,११,००० रुपये व चषक, अंतिम उपविजयी संघास ७५,००० रुपये व चषक, उपांत्य उपविजयी संघास प्रत्येकी २५,००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू, चढाईपटू व पकडपटू अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here