राज ठाकरे यांनी ‘फडणवीस’ नावाचा सांगितला किस्सा

0

पुणे : ‘फडणवीस हे मुळात आडनाव नाही. ते मूळचा पर्शियन शब्द आहे. ‘फर्द नलीस’. ‘फर्द’ म्हणजे कागद, ‘नलीस’ म्हणजे लिहिणारा. त्यावरून फर्द नलीस. नंतर फडावर बसून लिहिणे आले. त्यातून पुढे फडणवीस हे असे झाले आणि पुढे व्यक्तीच्या नावाला चिकटले,’ असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी यावेळी ‘फडणवीस’ या नावाचा किस्सा सांगितला. ‘भाषेच्या बाबतीतही माझं अनेकदा त्यांच्याशी बोलणं झालं आहे. शिवकालीन मराठी कशी होती आणि ती कशी बदलत गेली हे बाबासाहेबांशी बोलण्यातून समजतं. ‘ळ आणि ल मधला फरक काय असतो, कैसी आणि कैची या शब्दांचा काय संबंध आहे हे समजतं. मराठीत आलेले अनेक शब्द फारसी आहेत. पण त्याबद्दल आपल्याला माहिती नसते. अनेक आडनावं कशावरून आली हे माहीत नसतं. मला त्यात रस असल्यानं मी त्यांच्याशी त्याबद्दल बोललोय. त्यातून शब्दांचा खजिना उलगडत गेला, असे राज म्हणाले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:44 PM 29-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here