मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

0

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू ओढवल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. विजय श्रीरंग राऊत (रा. लोटे) असे त्या मृत झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. तो आपल्या ताब्यातील दुचाकीने लोटे येथून चिपळूण येथे जात असताना एका अज्ञात वाहनाने ठोकर दिली. या अपघातात तो दुचाकी वरून रस्त्यावर कोसळला. त्याच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने त्याचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह रस्त्यावर कोसळल्याने त्याची ओळख पटवणे अवघड बनले होते. दरम्यान घटनास्थळी त्याच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटवण्यात यश आले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here