दिल्ली निवडणुकीची तारीख जवळ आल्यानंतर आता रंगत वाढत चालली आहे. विविध पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता लक्ष प्रचारसभांच्या नियोजनावर लागले आहे. दिल्ली विजयासाठी भाजपने कंबर कसली असून महाराष्ट्रातील नेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. कालपासून महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात सहभागी झाले आहेत. राज्यातून एकूण 25 जणांवर दिल्ली निवडणुकीची जबाबदारी दिली जाणार असून देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे कालपासूनच दिल्लीला प्रचारासाठी रवाना होणार आहेत. तर चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत प्रचारासाठी रवाना आहेत. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत प्रचाराला गेलेल्या विनोद तावडेंवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.महाराष्ट्रात सरकारी शाळा बंद करणारे आता दिल्लीला प्रचाराला आले आहेत, अशा शब्दात केजरीवाल यांनी तावडेंचा समाचार घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.
