गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चिपळूण पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

0

वरवेली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकत्यांना कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करा, असे आवाहन केल्यानंतर अनेक मनसे कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अनेकजण प्रत्यक्ष पूरग्रस्त भागांत जाऊन बचाव आणि मदतकार्यात सहभागी झाले होते. याच अनुषंगाने गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना गुहागर मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर आणि मनसेचे कार्यकर्ते पुरातील संकटग्रस्तांना मदत करत आहेत. तसेच गुहागर मनसेतील सर्व मनसे कार्यकर्त्यांनी थोडी मदतीचा हात पुढे करावा. पूरग्रस्त आपलीच लोक आहेत. आपण कितीही मदत करा ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी मदत करा, चिपळूण पूरग्रस्तांना आपल्या मदतीची आज खरच नितांत गरज आहे हे लक्षात घेऊन मदतीचा ओघ वाढला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कौंढर काळसूर युवा ग्रुप मनसे सैनिक, सामाजिक उद्योजक कार्यकर्ते प्रमोद गांधी, मनसे कार्यकर्ते विजय जानवळकर, चिपळूण उपतालुका अध्यक्ष विश्वनाथ ठोलस, संदेश साळवी, अंजनवेल विभाग अध्यक्ष तेजस पोफळे, उपविभाग अध्यक्ष स्वप्नील कांबळे, संजय डिंगणकर, रुपेश घवाळे, अमित संयत, रुतिक गावणकर, विवेक जानवळकर, प्रसिद्धी माध्यमप्रमुख प्रीतम सुर्वे आदी उपस्थित होते. गुहागर तालुका मनसेच्यावतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन गरजूंना मदतीचा हात पुढे करीत आली आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तेव्हापासून गरजू लोकांना नेहमीचा मदतीचा हात गुहागर मनसेने दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:50 PM 30-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here