लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे चिपळूणवासीयांसाठी मदत

0

रत्नागिरी : भूकंप, दुष्काळ अशा आपत्ती अनुभवलेल्या लातूरकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पूरग्रस्त चिपळूणवासीयांना स्नेहाची शिदोरी दोन ट्रक भरून पाठवली आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पूरग्रस्तांना मदत पाठवणारे लातूर हे महाराष्ट्रातील पहिले जिल्हाधिकारी कार्यालय ठरले आहे. चिपळूण येथील माजी तहसीलदार जीवन देसाई यांनी लातूर येथे बदलून गेल्यानंतरही चिपळूणची आठवण ठेवून मदतीचा हात पुढे केला आहे. लातूर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी (भूसंपादन विभाग) तसेच येथील तत्कालीन तहसीलदार जीवन देसाई यांनी आपले चिपळूणवासीयांशी असलेले ऋणानुबंध पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहेत. तत्कालीन चिपळूणचे तहसीलदार आणि सध्या लातूरचे उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी आपल्या चिपळूणच्या कारकिर्दीत चिपळूणच्या जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवले. यामुळे येथील जनतेमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. बदली झाल्यानंतर ते लातूरच्या भूसंपादन विभागात रुजू झाले. अजूनही त्यांची चिपळूणवासीयांशी नाळ जुळलेली आहे. जीवन देसाई यांच्यामार्फत चिपळुणातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किटसह अन्य साहित्य दोन ट्रक भरून पाठवले आहे. हे सर्व साहित्य घेऊन जीवन देसाई चिपळुणात आले. पूरपरिस्थितीतूनही त्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
4:49 PM 30-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here