सेवाकार्यामुळे समाजातील नकारात्मक चित्र बदलले : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0

मुंबई : कोरोना संसागाच्या सव्वा वर्षाच्या काळात शासकीय अधिकारी, कर्मचारी, अशासकीय संस्था व एकूणच समाजातील सर्व लोकांनी कर्तव्यापलीकडे जाऊन सेवाकार्य केल्यामुळे समाजातील नकारात्मक चित्र बदलले. समाजातील अधिकांश लोक चांगले काम करण्यास उत्सुक असतात. परंतु त्यांना काम करण्याची संधी मिळत नाही असे सांगून, कोरोना हे जसे आव्हान होते तसेच ती एक सेवेची संधी देखील होती, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत कोविड टास्क फोर्सच्या माध्यामातून कोरोना काळात कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते ‘ठाणे सिटिझनस प्राईड’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून सर्व करोना योद्ध्यांनी यानंतर जनतेमध्ये जाऊन मास्क वापर, सुरक्षित अंतर राखणे आदी करोना विषयक सावध आचरणाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर, ठाण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील, जिल्हा वैदयकिय अधिकारी डॉ कैलाश पवार, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, एस डी ओ अविनाश शिंदे, तहसिलदार अधिक पाटील, मनोरुग्णालयचे अधिक्षक डॉ संजय बोदडे, सर्कल अधिकारी संजय पतंगे, तलाठी आरती नितीन यशवंतराव, परिचारिका वर्षा दळवी, सारिका ढोकले, ठाणे पोलीस दलातील जहांगीर चोहारी, वॉर्डबॉय विक्की धाकोलिया, ठाणे महानगरपालिकेच्या कोविड टास्क फोर्स टीमचे वैदयकिय अधिकारी डॉ वैजयंती देवगेकर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ भीमराव जाधव, ठाणे महानगरपालिकेचे उपजिल्हाधिकारी वर्षा दिक्षीत, ठाणे महानगरपालिकेचे गिरीश झलके, डॉ. प्रेषिता क्षिरसागर, डॉ अनिता कापडणे, वैदयकिय अधिकारी डॉ मिलींद उबाळे, डॉ योगिता धायगुडे, डॉ खुशबू टावरी, डॉ अदिती कदम, डॉ ए ए माळगावकर, डॉ प्रज्ञा जाधव, डॉ जयेश पानोत, डॉ स्मिताली हमरूस्कर, डॉ अयाझ शेख, अधर कुलकर्णी, डॉ समिधा गोरे, दिलीप सुरेश महाले, ठाणे अग्निशामक दलाचे निलेश वेताळ, सिस्टर मंगल पवार, फादर बापटीस्ट विगास, बेथानी रुग्णालयाचे मुख्याधिकारी स्टीफन, डॉ संतोष कदम, डॉ अंकित ठक्कर, डॉ संदीप कदम, डॉ रहीश रवीन्द्रन, डॉ मुकेश उदानी, आदींना ठाणे सिटीझन्स प्राईउ ॲवार्ड २०२१ ने सन्मानित करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:01 PM 30-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here