परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड यांची जागतिक स्तरावर मुलाखत

0

रत्नागिरी : ३१ जुलै हा दिवस जागतिक वनक्षेत्रपाल दिवस म्हणून साजरा केला जातो. वनक्षेत्रपाल यांची भूमिका वन विभागामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. जागतिक वनक्षेत्रपाल दिनानिमित्त आयोजित जागतिक स्तरावरील कार्यक्रम वनक्षेत्रपाल यांच्या कार्याबाबत सादरीकरण करण्यासाठी रत्नागिरी (चिपळूण) वन विभागातील परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड यांची निवड झाली आहे. Exploring Womanhood Foundation च्या माध्यमातून जागतिक स्तरावर वनक्षेत्रपाल यांचेविषयी मानव वन्यजीव संघर्ष व संवर्धनविषयक अनुभव प्रियंका लगड मुलाखतीद्वारे मांडणार आहेत. जागतिक स्तरावरील ही मुलाखत जोई ग्राबोवस्की नॅशनल जॉग्रोफिक एक्सफ्लोअर, कॅनडा हे घेणार आहेत. हा कार्यक्रम ३१ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता https://www.globalbiofest.com/rangerday या लिंकद्वारे पाहता येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:19 AM 31-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here