रत्नागिरी: शिवभोजन थाळी बोगस लाभार्थी प्रकरणाच्या चौकशीसाठी नायब तहसीलदारांची नेमणूक

0

शिवभोजन थाळी बोगस लाभार्थी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक सदस्यीय समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून चौकशी अधिकारी म्हणून नायब तहसीलदार श्रृती सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल अन्न पुरवठा विभागाला सादर करण्यात येणार आहे. राज्य सरकारने गोरगरिबांसाठी शिवभोजन थाळी योजना सुरू केली. मात्र योजना सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये बोगस लाभाथ्यांना या योजनेचा लाभ दिला जात असल्याचे स्पष्ट झाले. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात शिवभोजन थाळीचा ठेका डीएम एंटरप्रायझेसला देण्यात आला आहे. जिल्हा रूग्णालयात दाखल गरजू रूग्णांसाठी या योजनेचे सेंटर जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले. परंतु, योजनेचा ठेका घेणाऱ्या डीएम एंटरप्रायझेसच्या दोन महिला कर्मचारी चक्क थाळी घेण्यासाठी लाईनमध्ये उभ्या असल्याचे दिसून आले. यानंतर याच महिला रांगेत उभे राहून शिवभोजन थाळीचे कुपन घेत होत्या. दोन महिला कर्मचारी चक्क शिवभोजन थाळीच्या मेसमध्ये काम करताना ही दिसत असल्याने शिवभोजन थाळीत बोगस लाभार्थी भरुन दिवसभराचे शंभर थाळीचे टार्गेट कागदोपत्री पूर्ण करुन पैसे लाटण्याचे काम ठेकेदार करत असल्याचे उघड झाले आहे. या संपूर्ण प्रकाराची दखल जिल्हा पुरवठा विभागाने घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले आहेत. चौकशी अधिकारी म्हणून नायब तहसीलदार श्रृती सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. चौकशी अधिकारी चौकशी अहवाल पुरवठा अधिकाऱ्यांना सादर करतील, चौकशी अहवालानंतर कारवाईबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here