नोंदणीकृत धर्मादाय न्यास/संस्थांनी पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन

0

रत्नागिरी : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय रत्नागिरी च्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत धर्मादाय न्यास/संस्था यांनी राज्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे गरीब, कष्टकरी तसेच मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न, धान्य औषधे इत्यादी मदत तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून धर्मादाय संस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधावा किंवा मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शक्य ती मदत करावी, असे आवाहन प्र. अधीक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, रत्नागिरी विभाग रत्नागिरी यांनी कळविले आहे. मुख्यमंत्री सहायता निधी खाते क्र.१०९७२४३३७५१ स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट मुंबई ४००००१ शाखा कोड ००३०० आयएफएस कोड SBIN0000300 असा आहे, असे कळविण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:08 PM 31-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here