“नारायण राणे कुठेही गेले तरी, शिवसैनिक म्हणूनच ओळख कायम राहणार”: संजय राऊत

0

अहमदनगर :  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना टोला लगावत, ते कुठेही गेले तरी, त्यांची ओळख कायम शिवसैनिक म्हणूनच राहणार असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेत माज असायलाच हवा. कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघासारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार, असे सांगत, पंतप्रधान मोदी म्हणतात, कैसे हो भाई? याला सत्ता म्हणतात. सत्ता हा मानसिक आधार असतो. सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना गडचिरोलीला पाठवू का असा दम देऊ शकतो, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. तसेच गुजरातेतदेखील सामना पेपर घेतात, असे राऊत यांनी नमूद केले. नगर येथे एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी कानपिचक्या दिल्या.

संसदेत अनेक खासदार येतात. बऱ्याच खासदारांना कोणी ओळखतही नाहीत. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. शिवसैनिक म्हणून ही ओळख आहे. पक्ष सोडून गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. हा नारायण राणे. तो आमका असे म्हटले जात नाही. तो शिवसैनिक आहे, असेच म्हटले जाते. तुम्ही कुठेही जा, लोकं तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार. आमदार आणि खासदार माजी होतो. पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वाईल्ड लाइफ फोटोग्राफर आहेत. ते वाघ आणि सिंहाचे फोटो काढतात. इतर प्राण्यांचे नाही, असा चिमटा काढत दिल्लीच्या‌ तख्तावरही भगवा फडकवू. हरलेल्या जागा पुन्हा जिंकायच्या आहेत. तीच खरी बाळासाहेबांना मानवंदना राहील, असे संजय राऊत म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:29 PM 31-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here