खासदार श्रीकांत शिंदे यांचा कोकणवासियांना मदतीचा हात

0

कल्याण : जोरदार अतिवृष्टीने कोकणाला जबरदस्त तडाखा बसला आहे. अनेकांचे मृत्यू झाले आहेत. तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे थेट कोकणात पोहचले. ही मदत देण्यासाठी डोंबिवली शिवसेना शहर शाखेने पुढाकार घेतला आहे. खासदारांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी कोकणातील पूरग्रस्त महाड, खेड, चिपळूण या भागातील नागरीकांना अन्नाधान्य, चादरी, चटई, कपडे, भांडी, शेगडी, पिण्याचे पाण्याचे वाटप केले. 16 ट्रक आणि एक एसटी महामंडळाची बस मदत साहित्य घेऊन 30 जुलै रोजी कोकणात रवाना झाली होती. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे, मा. नगरसेवक दिपेश म्हात्ने, विश्वनाथ राणो, राजेश कदम, मा. सरपंच खोणी हनुमान ठोंबरे, उल्हासनगर मनपा नगरसेवक अरुण आशान, व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पूराचे पाणी ओसरल्यावर पूरग्रस्त भागात वाहून आलेला कचरा, गाळ, घाण जमा होणे आणि यामुळे विषाणूंचा प्रसार होऊन साथीचे आजार वाढण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन तातडीने शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री आणी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी आणि टीडीआरएफ जवानांच्या मदतीने कोकणातील महाड शहर स्वच्छ आणि निर्जंतूकीकरणाचे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. आज खासदार शिंदे यांचे सह अन्य स्थानिक प्रशासनासह महाड येथील विविध पूरग्रस्त भागांना भेट देत तेथील नागरिकांशी संवाद साधत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच शहरात सुरु स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. त्याचबरोबर महाड येथील कोठेश्वरी तळे, प्रभात कॉलनी येथील पूरग्रस्ताना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाजवळ डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने पूरग्रस्त बांधवांकरिता आरोग्य शिबीर सुरु असून या शिबिराला भेट देत तेथील डॉक्टरांशी संवाद साधत नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात आरोग्य तपासणी करुन घेण्याचे आवाहन खासदार शिंदे यांनी याप्रसंगी केले. या मोफत आरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी नंतर रुग्णांना लागणारी औषधे मोफत दिली जात आहेत.

त्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:19 PM 31-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here