जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे चिपळूणला ११ टन हून अधिक धान्य वाटप

0

चिपळूण : श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे चिपळूण शहरातील वेगवेगळ्या भागांत धान्यांच्या ३२५ कीटचे वाटप करण्यात आले. एकूण ११ टन ३७५ किलोचे हे धान्य गरजूंना देण्यात आले. या उपक्रमाचा प्रारंभ जिल्हा न्यायाधीश एन. एस. मोमीन, न्यायालय-१ चिपळूण तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चिपळूण यांच्या हस्ते बुधवारी झाला. यावेळी दिवाणी न्यायाधीश श्रीमती जे. जे. माने, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चिपळूण सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. पावसकर उपस्थित होते. यावेळी १०० कीट वाटण्यात आली होती. चिपळूण शहर संपूर्ण पाण्याखाली गेल्याने येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरे पाण्याखाली गेल्याने येथे अनेक कुटुंबे उघड्यावर आहेत. अतिशय अडचणीत असलेल्या या कुटुंबांना चरितार्थासाठी तातडीने उपयोगी पडावे म्हणून या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. गेल्या तीन दिवसांत ३२५ पूरग्रस्त कुटुंबांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटण्यात आली. प्रत्येक कीटमध्ये ३५ किलो धान्य होते. नेमक्या गरजूपर्यंत हे वाटप झाल्याने त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे. त्यांना त्याचा मोठा आधार झाला आहे. या प्रत्येक कीटमध्ये २० किलो तांदूळ, ५ किलो गव्हाचे पीठ, २ किलो तूरडाळ, दोन किलो कांदे, २ किलो बटाटे, खाद्य तेलाची पिशवी एक, मसाला तिखट २५० ग्रॅम, हळद ५० ग्रॅम, मिठाची पिशवी १ किलो, मेणबत्ती ५ नग, काडीपेटी १ बॉक्स, आदींचा समावेश आहे. चिपळूणच्या मिरजोळी जुवाड, शंकरवाडी, कोंड्ये, कापसाळ, मार्कंडी, परकार चाळ, विरेश्वर कॉलनी, भोगाळे, रॉयल नगर, खेर्डी खटाटेवाडी, दळवटणे बागवाडी, गोवळकोट, वडनाका, मार्कंडी या भागात हे धान्य वाटण्यात आली. यातील काही कीट आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते वाटण्यात आली. धान्य वाटपाचे हे काम यापुढेही चालू राहणार आहे. संस्थानचे लोक गरजू लोकांचा सर्व्हे करीत आहेत. जिथे गरज आहे तिथे असे धान्य वाटप केले जाणार आहे. दरम्यान या कीट वाटपाची सुरूवात बुधवारी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, रत्नागिरी व जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नाणीज यांच्या संयुक्त विद्यमाने झाली. यावेळी १०० कीट वाटण्यात आली. जिल्हा न्यायाधीश एन. एस. मोमीन, न्यायालय-१ चिपळूण तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चिपळूण यांच्या हस्ते झाला. यावेळी दिवाणी न्यायाधीश श्रीमती जे. जे. माने, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चिपळूण. सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. पावसकर, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग -१ चिपळूण. के. ओ, पेंढाबकर, वरिष्ठ लिपीक जिल्हा न्यायालय चिपळूण, संस्थानचे विश्वस्त कुंडलिकराव वायभासे, संस्थानचे अधिकारी विनोद भागवत, राजन बोडेकर, विवेक कांबळी व महेश ठसाळे आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:38 AM 02-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here