रत्नागिरी रेफ्रिजरेशन असोसिएशन मार्फत चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत

0

रत्नागिरी : चिपळूण येथील परिसरात अचानक उद्भवलेल्या पुरामुळे शहरवासीयांची वाताहत झाली. पुरामध्ये घरातील साहित्य वाहून गेल्याने अतोनात नुकसान झाले. अशा परिस्थितीत या बांधवांना अनेक सामाजिक संस्था, संघटनानी पुढाकार घेऊन या लोकांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. रत्नागिरी येथील रेफ्रीजरेशन अँन्ड एअरकंडिशनर व्यवसायात काम कराणारे टेक्निशियन यांनी एकत्र येऊन जमेल तशी मदत करून चिपळूण येथील काही भागात जाऊन चटई, चादर, ब्लँकेट, लहान मुलांचे कपडे, साडी, बेकरी अँटम, अत्यावश्यक औषधे इत्यादी आदींचे वाटप करण्यात आले. रत्नागिरी रेफ्रिजरेशन टेक्निशियन असोशियनच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून राबवलेल्या कार्यात सर्व टेक्निशियन यांनी मोलाचे सहकार्य दिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:30 AM 02-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here