खेडमध्ये पुरामुळे नळपाणी योजनांचे 4 कोटींचे नुकसान

0

खेड : कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील 90 पेक्षा अधिक नळपाणी योजनांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक नळपाणी योजना वाहून गेल्या आहेत तर काही गाळामध्ये रुतल्या आहेत. काही ठिकाणचे पंपहाऊस बिघडले असल्याने ग्रामस्थांना भर पावसात पाणी पाणी करावं लागत आहे. नळपाणी योजनांचे संभाव्य नुकसान सुमारे 4 कोटी रुपयांचे असावे असा अंदाज व्यक्त होत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

उपलब्ध माहितीनुसार रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ बी. एन. पाटील यांनी तातडीने या सर्व बाधित नळपाणी योजनांचे सर्वेक्षण करून अहवाल मागवले असून बाधित योजना तत्काळ दुरुस्त करण्याला प्राधान्य दिले जाईल असे म्हटले आहे. नळपाणी योजना बाधित झाल्याने ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे त्या गावांना शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:44 PM 02-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here